आ. सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी कन्नड तालुक्यात महायुतीची एकजूट

Foto
कन्नड, (सांजवार्ता ब्युरो) : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी कन्नड तालुक्यात महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने कंबर कसली असून, त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याच अनुषंगाने आज कन्नड येथील शिक्षकांची पतसंस्था सभागृह, पिशोर रोड येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीत आ. संजना जाधव म्हणाल्या की, सतीश चव्हाण यांच्या पाठीशी महायुतीची भक्कम ताकद उभी असल्याने यावेळचा त्यांचा विजय ऐतिहासिक ठरणार आहे. सभागृहात बेरोजगारांचे आणि पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी सतीश चव्हाण नेहमीच अग्रेसर असतात. पक्षभेद न पाळता ते सर्वांना मदत करतात. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची कार्यपद्धती हीच त्यांची खरी ताकद आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे म्हणाल्या की, चव्हाण हे सर्वसामान्यांचे आश्वासक नेतृत्व आहे. मराठवाड्यातील ७६ तालुक्यांमध्ये विस्तारलेल्या
मराठवाड़ा पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026
आ. मतिरा चव्हाण
या प्रचंड मोठ्या मतदारसंघातील कोणतीही व्यक्ती सतीश चव्हाण यांना सहज भेटून आपल्या समस्या मांडू शकते. नियोजन बैठकीला आ. संजना जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. मनोज राठोड, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे, राष्ट्रवादीचे नेते संतोष कोल्हे, संपर्क प्रमुख महेश उबाळे, प्रताप राठोड, पं.स. उपसभापती माया सुरासे, जि. प. सदस्य डॉ. दिलीपसिंग राजपूत, जि. प. सदस्य अर्जुन पाटील, कृउबा समितीचे मा. सभापती प्रकाश घुले, खरेदी-विक्री संघाचे सभापती ज्ञानेश्वर निकम, उपसभापती जयेश बोरसे, शेखनाथ चव्हाण, पुंडलीक राठोड, विकास जिवरख, शिवकुमार जैस्वाल, सुदाम राठोड, उपनगराध्यक्षा रंजना राठोड, शिवसेनेचे शहरप्रमुख राम पवार, पं. स. सदस्य अरविंद राठोड, पं. स. सदस्य सिद्धेश्वर झालटे, किशोर पवार, आदित्य गर्जे, नगरसेवक संदीप घोंगटे, आकाश झिमन, शिवाजी थेटे आणि रत्नाकर पंडित उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions